मीच माझा रक्षक

मीच माझा रक्षक


मीच माझा रक्षक
रक्षक मी देशाचा ।
संयम, शिस्त, कर्तृत्व
सेवक मी जनाचा ।।

पाऊल माझे हातात
आदर्श इतिहासाचा ।
स्वयंस्फूर्त, कर्तव्य
वसा गांधीजींचा ।।

भान वास्तवाचे
कावा शिवरायांचा ।
युद्ध, दातृत्व, निर्धार
बुध्द भारताचा ।।

रात कोरोनाची
लढा शासनाचा ।
लढा, धडा, सडा
माणसा- माणसाचा ।।

साथ एकीची
आरंभ एकेकाचा ।
पानिपत दुश्मनाचे
विजय रक्षकाचा ।।


चेतन बोडेकर, वैभववाडी.
9421266621

Comments

Post a Comment