Posts

Showing posts from June, 2020

मीच माझा रक्षक

मीच माझा रक्षक मीच माझा रक्षक रक्षक मी देशाचा । संयम, शिस्त, कर्तृत्व सेवक मी जनाचा ।। पाऊल माझे हातात आदर्श इतिहासाचा । स्वयंस्फूर्त, कर्तव्य वसा गांधीजींचा ।। भान वास्तवाचे कावा शिवरायांचा । युद्ध, दातृत्व, निर्धार बुध्द भारताचा ।। रात कोरोनाची लढा शासनाचा । लढा, धडा, सडा माणसा- माणसाचा ।। साथ एकीची आरंभ एकेकाचा । पानिपत दुश्मनाचे विजय रक्षकाचा ।। चेतन बोडेकर, वैभववाडी. 9421266621