Posts

मीच माझा रक्षक

मीच माझा रक्षक मीच माझा रक्षक रक्षक मी देशाचा । संयम, शिस्त, कर्तृत्व सेवक मी जनाचा ।। पाऊल माझे हातात आदर्श इतिहासाचा । स्वयंस्फूर्त, कर्तव्य वसा गांधीजींचा ।। भान वास्तवाचे कावा शिवरायांचा । युद्ध, दातृत्व, निर्धार बुध्द भारताचा ।। रात कोरोनाची लढा शासनाचा । लढा, धडा, सडा माणसा- माणसाचा ।। साथ एकीची आरंभ एकेकाचा । पानिपत दुश्मनाचे विजय रक्षकाचा ।। चेतन बोडेकर, वैभववाडी. 9421266621

गड्या गाव आपलो भलो……

गड्या गाव आपलो भलो…… चेतन बोडेकर, सिंधुदुर्ग. खराच सांगतंय तुका, गड्या गाव आपलो भलो ||धृ|| मोकळी हवा पोटभर जेवा | मातीची घागर नात्याक पाझर | आणि चाय पिवुक आजुन आम्ही, वापरताव पेलो….. ||1|| कष्टाचो घास गळ्याक नाय फास | वळणाचो रस्तो भाजीपालो सस्तो | आणि साध्या - सुध्या आजाराक आम्ही, चघळताव पालो…||2|| रशयेक कुंभयो परसाकडं तांबयो | जोताक पाडो बाळतीनीक काढो | आणि रोगा- बिगाचो हयं, येत नाय घालो….||3|| फणसाच्यो गोटयो नाय कपाळार आटयो | देशीचो खंबो पावण्याक कोंबो | आणि नात्या-गोत्यासाठी, सदीचो दरवाजो खुलो…..||4|| भात आणि पिठी दुधा-दह्याची वाटी | तंबाखुची डबी अळवाची वडी | आणि दररोज लागता वासाक, शेंगटो नि बळो….||5|| परसात व्हाळ भजनात टाळ | गौरीक ववसो गटारीक रसो | आणि लहान - थोरा येका मतानं, करताव धयकालो….||6|| नांगर धुणी चुलीत शेणी | कंरदीचा पेपित्रा नाष्ट्याक सकात्रा | आणि बाजाराक पुरत नाय आमका, काखेचो ठेलो…||7|| वर्षाची जत्रा नवी नवी पाखरा | दोन पायाची गाडी नववारी साडी | आणि बाह्यरं- भुत...